Red Onion Rate – लाल कांद्याला मिळतोय विक्रमी दर पहा आजचे नविन दर

Onion Market News : दिपावलीनिमीत्त बंद झालेल्या बाजारसमित्यांमध्ये शेत मालाची आवक वाढू लागली आहे. नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. दरम्यान नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कालपासून कांद्याची आवक सुरू झाली आहे.

आता पाच वर्षे मिळणार फुकट रेशन यादित आपले नाव चेक करा

लाल व गावरान कांद्याची 36 हजार 476 क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक कमी असल्याने लाल कांद्याला विक्रमी 4 हजार 850 रूपये भाव मिळत आहे.

शिल्लक राहिलेला गावरान कांदा बाजारात येत आहे. दरम्यान काल झालेल्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. एक नंबरच्या गावरान कांद्याला 3 हजार 800 रुपयांपासून 4 हजार 300 रुपयांपर्यंत भाव निघाला.

यानंतर दोन नंबरच्या कांद्याला 2 हजार 400 ते 3 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर निकृष्ट तीन नंबरमध्ये गणला जाणाऱ्या कांद्याला 1 हजार 400 रुपये ते 2 हजार 400 रुपये दर मिळत आहे. तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कांद्याला 700 रुपयांपासून पुढे विकण्यात आला.

आपल्या जमीनीचा नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर/डिजिटल सात बारा काढा आता मोबाईलवर

मिळालेल्या माहितीनुसार, गावरान 21 हजार 174 क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याची 15 हजार 302 क्विंटल आवक झाली. एक नंबरचा लाल कांदा 3 हजार 950 ते 4 हजार 850 रुपये क्विंटलप्रमाणे विकण्यात आला.

नंबर दोनच्या कांद्याची 2 हजार 750 रुपये ते 3 हजार 750 रुपये, तर नंबर तीनचा 1 हजार 800 रुपयांपासून 3 हजार 750 रुपये, तर नंबर चारचा कांदा 1 हजार ते 1 हजार 800 रुपये विकला गेला, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी माहिती दिली.

या जिल्ह्यात मिळतोय कापसाला 7 हजार 825रूपये भाव कापसाच्या आवकेसह दरातही चांगली वाढ ; शेतकऱ्यांना दिलासा

सध्या लाल कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावले आहेत. मात्र, हा कांदा ठराविक शेतकर्‍यांनी पिकविला आहे. यावर्षीचे कांदा भाव लक्षात घेऊन काही शेतकरी अजूनही लाल कांद्याची लागवड करताना दिसत आहेत.

 

Leave a Comment