या जिल्ह्यात मिळतोय कापसाला 7 हजार 825रूपये भाव कापसाच्या आवकेसह दरातही चांगली वाढ ; शेतकऱ्यांना दिलासा

Cotton Rate दरवाढीच्या अपेक्षेने आजवर साठवून ठेवलेले कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. दिवाळीनंतर कापूस तसेच सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. कापसाचे दर हमीभावापेक्षा जास्त गेले आहेत. दुसरीकडे सोयाबीनच्या दरातही तेजी आल्याने सोयाबीनची आवक वाढली आहे.

आता शेतकऱ्यांना मिळणार तीन वर्षात नविन ठिबक सिंचन संच Change In Subsidy Policy By Center For Drip irrigation

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन आणि कापूस दरात सातत्याने चढ़-उतार राहिले आहेत. सद्यःस्थितीत कापसाला सर्वच बाजारात 7 हजार 825 रुपयांवर भाव मिळत आहे. जिल्ह्यातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या यवतमाळच्या बाजारात 7 हजार 825 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे कापसाला दर मिळत आहे. सध्या रब्बी हंगामात पैशांची आवश्यकता भासत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी पांढरे सोने आणि सोयाबीन विक्री करीत आहेत.

जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. आता हळूहळू कापसाची आवकही वाढू लागली आहे. दोन्ही पिकांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर खाली आले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली होती. आता सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे. सध्या सोयाबीनचे दर पाच हजार दहा रुपये ते पाच हजार 305 रुपयांवर गेले आहेत.

Redmi ने धमाकेदार ऑफरसह आपले नवीन मॉडेल Redmi Note 12 लाँच केले, 48MP+8MP+2MP ट्रिपल कॅमेरा दिला जाईल.

लांब स्टेपलच्या कापसाला 7 हजारांवर दर
सोयाबीननंतर कापसाच्या दरातही सुधारणा होत आहे. लांब स्टेपलच्या कापसाला 7 हजार 20 तर मध्यम स्टेपलच्या कापसाला 6 हजार 620 रुपये हमीभाव आहे. त्या तुलनेत कापसाला चांगला दर मिळत आहे. सध्या बोरी अरब बाजार समितीत सात हजार 155 रुपये दर मिळत आहे. कापूस खरेदीच्या सुरवातीलाच चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल असलेला कापूस दिवाळीनंतर आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अकोट बाजारपेठेत कापसाला प्रतिक्विंटल 7 हजार 825 रूपये दर मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भाववाढीच्या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत असून कापूस आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खुल्या बाजारातील सर्वाधिक कापूस आपल्यालाच मिळावा या स्पर्धेतून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुरूवातीला 7 हजार 800 रूपये दर दिला मात्र पुढील काळात हे दर टिकतील का नाही याची शाश्वती देता येणार नाही.

सरकीचे दर उत्पादनही घटले

खुल्या बाजारातील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून आहेत.
गेल्या वर्षी 4 हजार 200 रूपये क्विंटल असलेली सरकी यावर्षी 3 हजार 300 ते 3 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. त्यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात प्रचंड घट होणार आहे.

Leave a Comment