Cotton market rate :- या चालू हंगामात देखील कापूस बाजारभाव फारच दबावात आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजार भावात नॉर्मल सुधारणा पाहायला मिळाली आहे.
जागतिक बाजाराचा विचार केला असता तेथे बाजारभावात चढ-उतार सुरू आहे. मात्र जागतिक बाजारात सुरू असलेली परिस्थिती आगामी काळात बाजार भावाला आधार देणार हे स्पष्ट होत आहे.
परिणामी देशांतर्गत बाजारात देखील कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. आगामी काळात बाजार भावात सुधारणा होण्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत.
देशांतर्गत बाजारात गेल्या दोन दिवसांमध्ये कापसाचे भाव शंभर रुपयांनी वधारले आहेत. ही एक गोष्ट शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.
आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी
बाजारभावात सुधारणा होत असल्याने आगामी काळात आणखी भाव कडाडणार अशी भोळी भाबडी अशा शेतकऱ्यांना देखील लागली आहे.
सध्या बाजारात 7000 ते 7400 या दरम्यान कापसाची विक्री होत असून सरासरी बाजार भाव 7,200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. Cotton market rate
विशेष बाब अशी की, काही बाजार समित्यांमध्ये कमाल बाजारभाव 7500 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला आहे. अशातच आता जाणकार लोकांनी यामध्ये आणखी वाढ होणार अशा आशावाद व्यक्त केला आहे.
असे तज्ञांनी म्हटले आहे. तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे सध्या जागतिक बाजारात कापूस महाग विकला जात आहे. तसेच आपल्या देशात कापसाचे भाव जागतिक बाजाराशीं तुलना केली असता 2250 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत
स्वस्त पाहायला मिळत आहेत. यामुळे आपल्या देशातील कापसाला मागणी आहे. विशेष म्हणजे आगामी काळात देखील ही मागणी टिकून राहील अशी आशा आहे. Cotton market rate