आता शेतकऱ्यांना मिळणार तीन वर्षात नविन ठिबक सिंचन संच Change In Subsidy Policy By Center For Drip irrigation

Drip irrigation केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदान वाटप धोरणात मोठे महत्त्वाचे बदल केले आहेत. तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला आता सात ऐवजी तीन वर्षांत पुन्हा सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच, अॅटोमेशनलादेखील अनुदानाच्या कक्षेत आणले गेले आहे.

नोकरी विषयक जाहिराती बघण्यासाठी

येथे क्लिक करा 

केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून पंतप्रधान सूक्ष्म सिंचनासाठी प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमासाठी अनुदान मिळते. या योजनेतील किचकट बाबी हटवून काही बदल करण्याचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठविला गेला होता.

👉आता ठिबक सिंचन साठी शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान 

येथे क्लिक करा 

त्यानुसार केंद्राने 2023 मधील नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले आहेत. सध्याच्या नियमानुसार सूक्ष्म संचासाठी सात वर्षांत पुन्हा अनुदान घेता येत नाही. आता हा कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

एखाद्या शेतात तुषार संचासाठी Drip irrigation अनुदान घेतलेल्या शेतकऱ्याला आता तीन वर्षानंतर ठिबक संच घेण्याकरिता अनुदान देता येणार आहे. परंतु, ठिबक अनुदानाची परिगणना करताना आधीच्या तुषार संचासाठी दिलेल्या अनुदानाची रक्कम ठिबकच्या अनुदानातून वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे.

How to apply online PVC Aadhaar card घरबसल्या करा आपले पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर

या बदलामुळे शेतकऱ्याला एकाच क्षेत्रावर पीक पद्धतीत बदल करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे ठिबकखालील क्षेत्रात वाढ होणार असून खते व पाण्याची बचत होण्यास मदत मिळेल, असे फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे.

फलोत्पादन संचालक डॉ.कैलास मोते यांनी सांगितले की, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात राज्य आघाडीवर आहे. मात्र, या योजनेत बदल करण्यासाठी 2022 मध्ये केंद्राला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील बदल स्वीकारण्यात आले आहेत.

ठिबक आधारित स्वयंचलित प्रणालीसाठी (अॅटोमेशन) आता प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील अॅटोमेशन आधारित उच्च तंत्रज्ञान कृषी व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

Source-Agrowon

Leave a Comment